जय देवी हरितालिके ।। सखि पार्वती अंबिके ।
आरती ओवाळींतें ।। ज्ञानदीपकळिके. ।।धृ ॥
हरअर्धांगी वससीं ।। जाशी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी ॥ यज्ञाकुंडी गुप्तः होसीं. जय देवी ….॥१।।
रिवसी हिमाद्रीच्या पोटी ।। कन्या होसी तूं गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी. जय देवी …. ॥२॥
तपपंचाग्निसाधने ।। धूम्रपाने अधोवदने ।
केली बहु उपोषणें ।। शंभूभ्रताराकारणे. जय देवी ….।।३।।
लीला दाखविसी दृष्टी ॥ हें व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हां वरिसी धुर्जटी ॥। मज रक्षावें संकटी. जय देवी …. ॥४॥
काय वर्णू तव गुण ।। अल्पमति नारायण ।।
माते दाखवीं चरण ।। चुकवावे जन्ममरण ।। जय देवी हरितालिके..॥५॥
Haritalika Aarti PDF:-https://whatsapp.com/channel/0029VbB0KvuIHphFXKcwyq3B
Telegram Channel:-https://t.me/HINDITERMINAL
ये भी पढ़ें : http://Faith and Action : A Purposeful, Peaceful, and Prosperous Life श्रद्धा और कर्म : लक्ष्यपूर्ण, शांत और समृद्ध जीवन।